Posts

माझ्या मराठीचा बोलू कौतुके – कासवही पैजा जिंके

Image
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात तब्बल आठ पुरस्कारांवर मोहोर उमटविणा-या मराठी चित्रपटांचा डंका देशभर वाजतो आहे. ‘कासव’ सुवर्णकमळाच्या शर्यतीत जिंकले आहे. ‘व्हेंटीलेटर’, ‘दशक्रीया’ तसेच ‘सायकल’ या चित्रपटांनीही बाजी मारली आहे.  दादासाहेब फाळके, सावेदादा, विष्णूपंत दामले, एस.फतेलाल, सी.रामचंद्र, बाबूराव पेंटर यासारख्या मराठी माणसांनी भारतीय सिनेमा रुजवला, वाढविला. मात्र मध्यंतरीच्या काळात मराठी सिनेमा रंजनाच्या गर्तेत हरवला होता. ‘श्वास’ चित्रपटाने मराठी सिनेमाच्या हरवलेल्या आत्मविश्वासाला नवसंजीवनी दिली. त्यानंतर मात्र मराठी सिनेमाने मागे वळून पाहिलेले नाही. आपण आता अभिमानाने म्हणू शकतो ‘माझ्या मराठीचा बोलू कौतुके – कासवही पैजा जिंके’. मराठी सिनेमा कथानक, अभिनय, दिग्दर्शन, गीत-संगीत या सर्वच बाबतीत हिंदी चित्रपटांच्या पुढे आहे. ‘शामची आई’ या प्रल्हाद केशव अत्रे दिग्दर्शित मराठी चित्रपटाला 1954 साली राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुवर्णकमळ मिळाले होते. त्यानंतर तब्बल 50 वर्षानंतर 2004 साली संदीप सावंत यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘श्वास’ चित्रपटाला सुवर्णकमळ मिळाले. त्यानंतरच्या एक तपाच्या कालखंडात…
Image
व्हा माध्यमकार

सध्याचे युग हे माहितीयुग म्हणून ओळखले जाते. आल्विन टॉफलर या विचारवंताने म्हटल्याप्रमाणे कृषी ,औदयोगिक या दोन युगानंतर आलेल्या'माहिती युगात'ज्ञान हीच खरी संपत्ती बनली आहे. त्यामुळे माहितीचे ज्ञानात रूपातंर करणारी माध्यमे व त्यातील  पत्रकार हे माहिती युगातील अत्यंत महत्त्वाचे घटक बनले आहेत.
               मागील तीन दशकात माध्यमांच्या क्षेत्राचा अफाट विस्तार झाला व त्यानुसार या क्षेत्रात मोठे बदल झाले आहेत. भारतात झपाटयाने विकसित होत असलेल्या क्षेत्रात माध्यम आणि रंजन क्षेत्राचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. वार्षिक 13.9 टक्के विकासदराने या क्षेत्राची वाढ होत असल्याने माध्यम व रंजन उदयोग क्षेत्रातील उलाढाल 2019 सालापर्यंत 2000 अब्ज रुपयापर्यंत जाईल असे अपेक्षित आहे. यावरुन या क्षेत्रातील वाढीचा धडाका आपल्या लक्षात येऊ शकेल.परिणामी माध्यम शिक्षणाच्या क्षेत्रातही मोठे बदल घडले आहेत.

पूर्वी छापून हाती येणार्‍या वृत्तपत्रे व नियतकालिकांपुरतीच पत्रकारांची कामगिरी असायची. भारतात आजच्या घडीला 70 हजार वृत्तपत्रे आणि 800 टेलिव्हिजन चॅनल्स आहेत. याशिवाय रेडिओ, सिनेमा, वेबपोर्टल,…

आर.के.लक्ष्मणः सामान्यांना बोलते करणारा असामान्य माणूस

Image
आर.के.लक्ष्मण यांच्याविषयी विचार करताना स्वानंद किरकिरेंच्या गाण्यातील हेच शब्द पुन्हा पुन्हा आठवत राहतात. आर. के. लक्ष्मण हा खरेच अ॑फाट माणूस होता, त्यांनी भारतात नवा इतिहास रचला. नाजूक कुंचल्याच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला नायक बनविण्याची किमया त्यांनी करुन दाखविली. एखादया कसलेल्या गुप्तहेराप्रमाणे हा सामान्य माणूस हवा तिथे डोकावत असे. पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, मोरारजी देसाई, व्ही.पी.सिंह, अटलबिहारी बाजपेयी, लालकृष्ण अडवाणी ,बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांच्यासह अनेक राजकारण्यांच्या घरात, विविध मंत्रालयात, प्रसंगी परदेशातही हा सामान्य माणूस मुशाफिरी करीत असे. समाजातील, राजकारणातील व्यंगावर नेमके भाष्य करीत असे. भारतात व्यंगचित्रे आणि व्यंगचित्रकाराला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे ऐतिहासिक कार्य आर.के.लक्ष्मण यांनी केले. यापेक्षाही थक्क कारायला लावणारी बाब म्ह्णजे, सर्वश्रेष्ठ वृत्तपत्रापेक्षा व्यंगचित्र प्रभावी असू शकते, हे त्यांनी सिध्द करुन दाखविले. तब्बल पाच दशके टाईम्स ऑफ इंडियात त्यांची व्यंगचित्रे प्रसिध्द होत असत. तेव्हा लोक बातम्या वाचण्याआधी, आज आर.कें.नी कोणते व्य…

झुंजार विकास पत्रकार बी. जी. वर्गीस

Image
‘In a shrinking world with information literally at our fingertips, the media needs to play a vital role as a trusted gatekeeper’ आजच्या या धकाधकीच्या काळात माध्यमांची भूमिका महत्वाची आहे असे सांगून, माध्यमांनी जनतेचे रक्षक म्हणून कामगिरी केली पाहिजे हे आग्रहपूर्वक सांगणारा एक भला माणूस मागच्या आठवडयात काळाच्या पडदयाआड गेला.   पत्रकार दिनाच्या निमित्ताने या माणसाचे मोठेपण आठवणे आणि त्यांचा संदेश मनात जागा ठेवणे गरजेचे आहे. स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात  भारतात ज्या प्रकारच्या पत्रकारितेची गरज होती ती ओळखून ज्या पत्रकारांनी लेखन केले  त्यात सर्वप्रथम नाव घ्यावे लागेल ते पत्रकार बी.जी.वर्गीस यांचे. निवृत्ती हा शब्दच ज्याच्या शब्दकोशात नव्हता त्या या अवलिया पत्रकाराची लेखणी अखेरच्या श्वासापर्यंत 30 डिसेंबर 2014 पर्यंत जनतेच्या प्रबोधनासाठी आणि विकासासाठी कार्यरत होती. वयाची 88 गाठली तरी या पत्रकाराच्या लेखनाची धार कायम होती.
बी.जी. वर्गीस यांचे पूर्ण नाब बूबली जॉर्ज वर्गीस . ते मूळचे केरळचे पण त्यांचे बालपण परदेशात व्यतीत झाले शालेय शिक्षणासाठी ते जेव्हा डेहराडूनच्या डून स्कूलमध्ये दाखल झ…

परिवर्तनाचे सामर्थ्य लाभलेली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता

Image
भारतीयपत्रकारितेचा इतिहास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेतील योगदानाचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही .1919 ते 1956 या जवळपास 37 वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतःच्या आणि इतरांच्या वृत्तपत्रात केलेले लेखन आणि संपादन ही कामगिरी अभूतपूर्व आहे.त्यांची पत्रकारिता समाज परिवर्तनाचे सामर्थ्य लाभलेली पत्रकारिता होती. लेखणीच्या सामर्थ्यातून क्रांती घडू शकते हे त्यांच्या पत्रकारितेने सिध्द केले.असे यश भारतात अपवादाने एखादयाच संपादकाला लाभले.             डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेने सतत नवविचारांची पेरणी करण्याचे कार्य केले, समाजातील जातीभेदाचे तण नष्ट करुन परिवर्तनाची पहाट निर्माण करण्यासाठीच त्यांची लेखणी सतत संघर्ष करीत होती. पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांनी जाणीवपूर्वक व विचारपूर्वक उडी घेतली. 1918 साली   मॉंटेग्यू सुधारणा अमलात आणण्याबाबत पाहणी करण्यास साऊथबरो कमिशनची नेमणूक करण्यात आली होती.भारतीयांना काही राजकीय हक्क मिळतील अशी परिस्थिती निर्माण झाली होती. अशावेळी दलित समाजाच्या हक्कांसाठी संघर्ष करण्याची हीच वेळ आहे …

National conference on Media and Society

About Solapur City
                        SOLAPUR is one of the important districts ofMaharashtraStatein India. It is located in the southern part ofMaharashtra. The famous religious places like Pandharpur and Akkalkot are in Solapur district only. Solapur has its own history. It is known for Textile industry. Solapur is transport hub connectingMaharashtra, Karnataka and Andhra Pradesh. It is well connected by Road and Rail to major districts and cities. Solapur city is 250 kms away from Pune About University
Solapur University was established on 1st August 2004 .The formation of the university at Solapur was a long cherished desire of the people of this region. Within a brief span of 8 years the university has taken significant stride towards excellence .Solapur University has been established to cater the needs of over 60,000 student’s community. The university is poised for an ambitious growth. The University is now a hub of various academic activities..In Solapur University there ar…