Thursday, May 9, 2013

पत्रकारितेतील करिअर संधी

एकविसावे शतक ' माहितीचे युग' म्ह्णून ओळखले जाते.आल्विन टॉफलर यांनी Future Shock या ग्रंथात जग तीन मोठया स्थित्यंतरांमधून पुढे जात विकसित झाले असे म्ह्टलेआहे. यातील पहिले स्थित्यंतर होते आदिम युगातून कृषी क्रांतीच्या युगात जाण्याचे. दुसरे स्थित्यंतर होते औदयोगिक क्रांतीचे आणि तिसरे  स्थित्यंतर आहे माहिती क्रांतीचे.
माध्यमांच्या क्षेत्रातील प्रगतीबाबत भारत नवनवीन उच्चांक प्रस्थापित करीत आहे.भारतातील माध्यमे आणि रंजन उद्योग क्षेत्राची (मिडिया एण्ड इंटरटेनमेंट इंडस्ट्री ) प्रतिवर्षी 11 टक्के विकासदराने वाढ होत आहे.यापुढच्या काळात हा विकासदर 14 टक्केपर्यंत वाढून 2015 मध्ये या क्षेत्रातील गुंतवणूक 1,27,500 कोटीपर्यंत जाईल असा अंदाज फिक्कीतर्फे 2011 मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे (संदर्भः www.business-standard.com ).
पत्रकारिता हे सर्जनशीलतेला संपूर्ण वाव देणारे क्षेत्र आहे.या क्षेत्रात रोज नव्या आव्हानांना सामोरे जावे लागते.

एकविसावे शतक 'माहितीचे युग' म्हणून ओळखले जाते. आल्विन टॉफलर या विचारवंताने म्हटल्याप्रमाणे शेती, औद्योगिक या दोन युगानंतर आलेल्या 'माहिती युगात' ज्ञान हीच खरी संपत्ती बनली आहे. त्यामुळे माहितीचे ज्ञानात रूपातंर करणारा पत्रकार हा माहिती युगातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.
पत्रकारितेच्या क्षेत्रात अफाट विस्तार झाला आहे. पूर्वी छापून हाती येणार्‍या वृत्तपत्रांपुरतीच पत्रकारांची कामगिरी असायची. आता छापील वृत्तपत्रे, रेडिओ पत्रकारिता, इंटरनेट पत्रकारिता, मोबाईल पत्रकारिता ही क्षेत्रे पत्रकारितेसाठी खुली झाली आहेत. त्याचबरोबर जाहिरात क्षेत्र, माहितीपट व चित्रपट क्षेत्र, जनसंपर्क क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, भारत सरकार व विविध राज्य सरकारांच्या माहिती यंत्रणा, कॉर्पोरेट क्षेत्र, शासकीय कार्यालये यात पत्रकारितेचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. भारतातील माहिती व रंजन उद्योगाच्या क्षेत्राचा सरासरी १४ टक्के वार्षिक दराने विकास होतो आहे. त्यामुळे पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांसाठी 'सुवर्णयुग' अवतरले आहे. पत्रकारितेच्या शिक्षणाला या माहिती युगात कमालीचे महत्त्व प्राप्त झाले आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रातील या सार्‍या प्रवाहांना कवेत घेणारा अभ्यासक्रम त्यासाठी निवडणे महत्त्वाचे असते. विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील तज्ज्ञांची समिती नेमून या सर्व बाबींचा विचार केला आणि एम. ए. मास कम्युनिकेशन हा अभ्यासक्रम तयार केला. देशातील बहुतांश विद्यापीठात हा अभ्यासक्रम आता उपलब्ध आहे. सोलापूर विद्यापीठात मागील तीन वर्षांपासून एम. ए. मास कम्युनिकेशन हा अभ्यासक्रम सुरू झाल्याने विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध झाली आहे. कोणत्याही विद्याशाखेच्या पदवीधर विद्यार्थ्याला या अभ्यासक्रमास प्रवेश घेता येतो. ज्या विद्यार्थ्याला वाचनाची, लेखनाची व वेगळे काही करण्याची आवड असते, तो पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण करून यशस्वी पत्रकार होऊ शकतो. पत्रकारितेच्या या अभ्यासक्रमात बातमी कशी लिहावी यापासून रेडिओसाठी टेलिव्हिजनसाठी लेखन कसे करावे, माहितीपट कसे निर्माण करावे, चित्रपटविषयक पत्रकारिता कशी करावी, जाहिराती

कशा तयार कराव्या
, जनसंपर्काचे कार्य कसे करावे, इंटरनेट पत्रकारिता कशी करावी याचे शिक्षण दिले जाते.
तंत्रज्ञानातील विकासामुळे वृत्तपत्रांची संख्या आणि खप वाढत आहे. रेडिओच्या क्षेत्रात एफ . एम. क्रांतीमुळे पत्रकारांना नोकरीच्या अमाप संधी खुल्या झाल्या आहेत. टेलिव्हिजन चॅनल्सची संख्या ४00 वर गेल्याने या क्षेत्रातही कुशल पत्रकारांसाठी सातत्याने संधी वाढत आहेत. जाहिरात आणि जनसंपर्काने तर माणसाचे सारे विश्‍वच व्यापले आहे. कोणत्याही ज्ञानशाखेत, कार्यालयात, उद्योगात, जाहिरात, जनसंपर्काचे कार्य करू शकणार्‍या तज्ज्ञ पत्रकारांची वानवा जाणवते. शासनालाही जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सशक्त माहिती यंत्रणा उभी करावी लागते. त्यासाठी पत्रकारितेचे शिक्षण घेतलेले माहिती अधिकारी हवे असतात. इंटरनेट व मोबाईल पत्रकारितेने तर या क्षेत्रातील करिअर संधीत प्रचंड वाढ केली आहे.
पत्रकारितेचे क्षेत्र हे आव्हानात्मक आणि तेजोवलय लाभलेले आहे. उच्चपदस्थ राजकारणी, समाजकारणी, अधिकारी, चित्रपट कलावंत, साहित्यिक, शास्त्रज्ञ इत्यादींच्या सतत संपर्कात राहण्याची संधी पत्रकारांना मिळते. त्यामुळे नवे काही करू इच्छिणार्‍यांसाठी पत्रकारिता हे खुणावणारे क्षेत्र आहे.
डॉ. रवींद्र चिंचोलकर
मो. ९८६00९१८५५
-->

विचार
सोलापुरी

एकविसावे शतक  'माहितीचे युग' म्हणून ओळखले जाते. आल्विन टॉफलर या विचारवंताने म्हटल्याप्रमाणे शेती, औद्योगिक या दोन युगानंतर आलेल्या 'माहिती युगात' ज्ञान हीच खरी संपत्ती बनली आहे. त्यामुळे माहितीचे ज्ञानात रूपातंर करणारा पत्रकार हा माहिती युगातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.
पत्रकारितेच्या क्षेत्रात अफाट विस्तार झाला आहे. पूर्वी छापून हाती येणार्‍या वृत्तपत्रांपुरतीच पत्रकारांची कामगिरी असायची. आता छापील वृत्तपत्रे, रेडिओ पत्रकारिता, इंटरनेट पत्रकारिता, मोबाईल पत्रकारिता ही क्षेत्रे पत्रकारितेसाठी खुली झाली आहेत. त्याचबरोबर जाहिरात क्षेत्र, माहितीपट व चित्रपट क्षेत्र, जनसंपर्क क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, भारत सरकार व विविध राज्य सरकारांच्या माहिती यंत्रणा, कॉर्पोरेट क्षेत्र, शासकीय कार्यालये यात पत्रकारितेचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. भारतातील माहिती व रंजन उद्योगाच्या क्षेत्राचा सरासरी १४ टक्के वार्षिक दराने विकास होतो आहे. त्यामुळे पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांसाठी 'सुवर्णयुग' अवतरले आहे. पत्रकारितेच्या शिक्षणाला या माहिती युगात कमालीचे महत्त्व प्राप्त झाले आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रातील या सार्‍या प्रवाहांना कवेत घेणारा अभ्यासक्रम त्यासाठी निवडणे महत्त्वाचे असते. विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील तज्ज्ञांची समिती नेमून या सर्व बाबींचा विचार केला आणि एम. ए. मास कम्युनिकेशन हा अभ्यासक्रम तयार केला. देशातील बहुतांश विद्यापीठात हा अभ्यासक्रम आता उपलब्ध आहे. सोलापूर विद्यापीठात मागील तीन वर्षांपासून एम. ए. मास कम्युनिकेशन हा अभ्यासक्रम सुरू झाल्याने विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध झाली आहे. कोणत्याही विद्याशाखेच्या पदवीधर विद्यार्थ्याला या अभ्यासक्रमास प्रवेश घेता येतो. ज्या विद्यार्थ्याला वाचनाची, लेखनाची व वेगळे काही करण्याची आवड असते, तो पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण करून यशस्वी पत्रकार होऊ शकतो. पत्रकारितेच्या या अभ्यासक्रमात बातमी कशी लिहावी यापासून रेडिओसाठी टेलिव्हिजनसाठी लेखन कसे करावे, माहितीपट कसे निर्माण करावे, चित्रपटविषयक पत्रकारिता कशी करावी, जाहिराती कशा तयार कराव्या, जनसंपर्काचे कार्य कसे करावे, इंटरनेट पत्रकारिता कशी करावी याचे शिक्षण दिले जाते.
तंत्रज्ञानातील विकासामुळे वृत्तपत्रांची संख्या आणि खप वाढत आहे. रेडिओच्या क्षेत्रात एफ . एम. क्रांतीमुळे पत्रकारांना नोकरीच्या अमाप संधी खुल्या झाल्या आहेत. टेलिव्हिजन चॅनल्सची संख्या ४00 वर गेल्याने या क्षेत्रातही कुशल पत्रकारांसाठी सातत्याने संधी वाढत आहेत. जाहिरात आणि जनसंपर्काने तर माणसाचे सारे विश्‍वच व्यापले आहे. कोणत्याही ज्ञानशाखेत, कार्यालयात, उद्योगात, जाहिरात, जनसंपर्काचे कार्य करू शकणार्‍या तज्ज्ञ पत्रकारांची वानवा जाणवते. शासनालाही जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सशक्त माहिती यंत्रणा उभी करावी लागते. त्यासाठी पत्रकारितेचे शिक्षण घेतलेले माहिती अधिकारी हवे असतात. इंटरनेट व मोबाईल पत्रकारितेने तर या क्षेत्रातील करिअर संधीत प्रचंड वाढ केली आहे.
पत्रकारितेचे क्षेत्र हे आव्हानात्मक आणि तेजोवलय लाभलेले आहे. उच्चपदस्थ राजकारणी, समाजकारणी, अधिकारी, चित्रपट कलावंत, साहित्यिक, शास्त्रज्ञ इत्यादींच्या सतत संपर्कात राहण्याची संधी पत्रकारांना मिळते. त्यामुळे नवे काही करू इच्छिणार्‍यांसाठी पत्रकारिता हे खुणावणारे क्षेत्र आहे.
डॉ. रवींद्र चिंचोलकर
मो. ९८६00९१८५५

कोण होतास तू काय झालास तू ?

खींचो न कमान को न तलवार निकालो जब तोप मुक़ाबिल हो तो अख़बार निकालो भारतावर इंग्रजांची राजवट होती त्या काळात अकबर इलाहाबादी यांनी लिहिलेला हा...